अंगाई गाऊन जुमन्ना ..... ‘पाळणागीत’

3 . अंगाई गाऊन ..... 


अंगाई गाऊन जुमन्ना झोपविते तुला 

लाडाचा माझा रे जुमन्ना झोपविते तुला 

नीज ना माझ्या बाबा का पाहसी असा 

आईच्या कुशीमध्ये तु राहसी जसा 

छानुल्या छकुल्या तु झोप रे आता

लाडक्या जुमन्ना तु झोप रे आता 

जो जो रे बाबा माझ्या जो जो रे….।। धृ । 


तुझा हवा चंद्राला , ओढ लावी जीवाला

मन हे बावरते पाहण्या तुला 

लोभ हया मनाला , काय सांगु जनाला 

धीर हा सुटते रे पाहण्या तुला 

मायेची सावली देते रे तुला …..।। १ ।।

 

काळीज माझं तु , जीवन माझं तु 

धन्य काया ही झाली रे आता 

सुख मी पाहिलं , तुझ्यामध्ये जाणिलं 

माझ्या या प्रेमाची लयं रे आता 

ममता का असते रे पाहिले आता .....।। २ ।।


 मर्मस्पर्श हा होतो मला हर्ष हा

 मायेची ममता कशी सांगु रे तुला

 लाड तुझा करिते , घास तुला भरिते 

 लाड लडवाळाने पुरविते तुला

 झोप का येईना सांग रे मला ……।।३ ।।




Comments