ऐकत का नाही .... “पाळणागीत”

 ऐकत का नाही .... 


( कायदा ... ) गीत - राम कोहपरकर 


बाळा जुमन्ना , हलविते पाळणा , सांग का झोपत नाही 

काम माझे पडले आहे रे बाळा , ऐकत का नाही .... 


कीर्तिरूपी घडशिल , असा गुणवान तु 

अजराअमर नाव होईल , असा विद्वान तू

तू माझा मान , तू स्वाभिमान

जपशिल ना रे सांग काही ....


सांभाळिले तुला नऊ , महिने नऊ दिन

याचसारखे जगवीन , तुला मी जिण

दुःख आईचे , तुझ्या मायेचे

बाळ का समझत नाही ....


जपणार जीवनाच्या पलिकडे तुला 

सावली उन्हामध्ये , देईन मी तुला 

लाड हा पुरे , काम अधुरे 

समझे ना उमजे मला काही ....



Comments