चला गं सयांनो....
चला गं सयांनो आज जाऊया
पाहुया नाव ठेवुया
नाव जुम्मन पहा ठेविले , पाळणा सर्वानी गायिले …..।।धृ ।।
कमरेत पट्टा हातकडे पायी चाळ
शोभून दिसतोय जुम्मन राजा बाळ
सारे जमले गं , लोक जमले गं
धिर हे माझे सुटले गं , मन वेळोवेळी तुटले गं .... ।।१ ।।
बाळाचा गं करूनी साज श्रृंगार
हर्ष मनविती पाहुनी हे संसार
सारे जमले गं , लोक जमले गं
काळजाचा हा तुकडा गं , चंद्राचा हा मुखडा गं ....
धन्य झाला ठुब्रीकर परिवार
मात पित्याची पुण्याई ही अपार
सारे जमले गं , लोक जमले गं
जगी चमत्कार झाले गं , बाळ जुम्मन जन्मास आले गं ....
Comments
Post a Comment