सायंकाळची प्रार्थना

 

सायंकाळची प्रार्थना 


॥ भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ॥

॥ महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ॥

॥ परमात्मा एक ॥


        भगवत् प्राप्तीकरिता , निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी चार तत्वे दिली आहेत .

१ ) परमात्मा एक ।

२ ) मरे या जिये भगवत् नामपर ।

३ ) दुःखदारी दूर करते हुये उध्दार ।

४ ) इच्छा अनुसार भोजन ।


        बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहेत .

आपल्या कुटुंबात व सेवकात

१ ) सत्य बोलणे .

२ ) मर्यादा पाळणे .

३ ) प्रेमाने वागणे .


        जीवनात चालण्याकरिता , गृहस्थी उंच आणण्याकरिता ,मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिले आहेत .


१ ) ध्येयाने एक परमेश्वर मानणे .

२ ) सत्य , मर्यादा व प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे .

३ ) अनेक वाईट व्यसन बंद करणे .


        ( दारु , टॉनिक , सट्टा , जुव्वा , लॉटरी , पटाची होड , कोंबड्याची काती , चोरी करणे , खोटे बोलणे , राग आणणे बंद करणे , स्त्रियांनी मुलांना व पतीदेवाला वाईट शब्दात बोलु नये . याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे . )

     

४ ) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे .

५ ) आपले कुटुंब मर्यादीत ठेवणे .


याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे .


मरे या जिये भगवत् नामपर ।

मरे या जिये भगवत् नामपर ।

मरे या जिये भगवत् नामपर ।


भगवान बाबा हनुमानजी की जय ।

महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।

परमात्मा एक ।।।


सत्य , मर्यादा , प्रेम कायम करनेवाले ,

अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले ,

मानव धर्म की जय ।।




Comments