आई नाव तुझे घेता..

आई नाव तुझे घेता.


आई नाव तुझे घेता , कंठ दाटुनी हा येई

लेक वाट तुझी पाही , कधी येशील ग आई….


हिमशिखरासंग खंबीर तु गं जुम्मनाची छाया

कार्य केलेस बाबाचे , चंदनासम झिझवुन काया

तुझ्या उपकाराची गाथा कशी सांगु कळत नाही…


नारी म्हणुन जन्मा आले , काय मोठा गुन्हा झाला

लख्तरमाच्या आबरूची चौका चौका रस्त्याला

मिळु दे मानाचे स्थान देण्या करण्या गं तु घाई….


कशी निष्ठुर ही पोर म्हणती आई आई तुला

तत्व शब्द नियम सोडुन विसरली मानवधर्माला

व्यथा पाहुन सेवकांची मन होते लाही लाही ......


Comments