घिर ना ही मना ....
धिर नाही मना , बाबा जुमन्ना , ऐक ना
हाक या दासाची , तुझ्या सेवकाची , बाबा तु ऐक ना...।।धृ ।।
शोधू कुठे तुला , कळे ना ही मला वाट किती पाहु बाळा
सुनी सुनी वाट ही सारी , नेत्र ही थकले आलोया द्वारी
माझ्या संगतीला , सदा सोबतीला बाबा तु ऐक ना ।।१ ।।
साद ही ऐकना , लाज तु राखना आलो तुझ्या द्वारी बाबा
आशिष मजला दयाना बाबा , सेवक तुजला चरणी बाबा
मोहमाया जडे , विकार घडे , बाबा तु धावना ।।२ ।।
आतुरले मन , नाही काही भान आसं तुझ्या दर्शनाची
तनमन अर्पण करतो तुजला , दे तु दर्शन आता मजला
शब्द हे रामाचे , तुझ्या दासांचे , बाबा तु ऐकवा ।।३ ।।
~गीत : राम कोहपरकर
Comments
Post a Comment