बाई हलवाना , झुलवाना ...“पाळणागीत”


बाई हलवाना , झुलवाना ...


( लोकगीत ) गीत- ईश्वर शाहीर


बाई हलवाना झुलवाना , हलवाना , झुलवाना 

अंग बाळाचा पाळणा , बाळाचा पाळणा

सरस्वताचा लालनागं , जो बाळा जो जो .... ।।धृ ।। 


बाई नागपूर शहरात , गोळीबार चौकात

ठुब्रीकर घराण्यात गा , जो बाळा जो जो रे ….।।१ ।।


सण एकोणवीससे एकवीस , तारीख तीन एप्रील महिन्यात

जन्मा आले साक्षात गा , जो बाळा जो जो रे .....।। २ ।।


आई सरस्वताच्या पोटी , बाप विठोबा गुणवान

बाळ जन्मले रूपवान गा , जो बाळा जो जो रे…. | | 3 | |


बाई जुम्मन बाळ गं पाळण्यात झुलते

शाहीर ईश्वर झुलविते गा , जो बाळा जो जो रे .... ।।४ ।।


Comments